भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी
कलम 21A : शिक्षणाचा हक्क :
- २००२ च्या ८६ व्या घटनादुरूस्तीनुसार '६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत' असा शिक्षणाचा मूलभूत हक्क स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
- १ एप्रिल २०१० : केंद्र सरकारने ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हक्क कायदा लागू केला.
कलम २९ ( १ ) :
भारतातील pc कोणत्याही व्यक्ती वा त्यांच्या समूहाला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार.
कलम २९ (२) :
राज्याच्या खर्चातून चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेस धर्म, वंश, जात, भाषा या किंवा अन्य कोणत्याही कारणांवरून कोणासही प्रवेश नाकारला जाणार नाही.
कलम ३० :
अल्पसंख्याक समूहांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क.
• कलम ३० ( १ ) :
अल्पसंख्याक जातींना स्वेच्छेनुसार धर्म किंवा भाषा या आधारे शिक्षण संस्था चालविण्याचा अधिकार.
कलम ३० (२) :
राज्यसंस्था एखाद्या शैक्षणिक संस्थेस सहाय्य करताना, ती संस्था धर्म किंवा भाषा या निकषांवर अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापनाखाली आहे, या कारणावरून कोणताही प्रतिकूल भेदभाव करणार नाही.
Post a Comment