स्पर्धा परीक्षेची तयारी करताय?
मग हे प्रश्न येतील तुमच्या उपयोगी
१. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते?
→ A. सोनार तंत्रज्ञान B. सोलार तंत्रज्ञान C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
सोनार तंत्रज्ञानाचा वापर हा पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. आणि Sonar या शब्दाचे फुल फॉर्म हा Sound Navigation and Ranging असा होतो..
२. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A. यमुना B. गंगा C. महानदी D. गोदावरी
→ हिराकुड हे धरण 1957 साली ओडिसा राज्यातील महानदी वर बांधण्यात आले असून याची पूर्ण उंची साधारण 60.96 मीटर आहे तर लांबी 25.8 किमी आहे.
३. पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
→A.9 B.6 C. 5 D. 4
पृथ्वीवर अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, हिंद महासागर, आर्क्टिक महासागर आणि दक्षिण महासागर मिळून एकूण 5 महासागर आहेत.
४. कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो ?
→ A. कावीळ B. विषमज्वर C. डास D. सर्व
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग असून यामध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.
५. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
→ A. पाय B. हृदय C. लहान मेंदू D. यकृत
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मनुष्याचा लहान मेंदू म्हणजे Cerebellum करते.
online Test सोडवा
Post a Comment