इतिहास | स्वातंत्र्यप्राप्ती

 स्वातंत्र्यप्राप्ती

महत्वपूर्ण मुद्दे:-

१९३० साली डॉ.मुहम्मद इक्बाल या प्रसिद्ध
कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडला.
 
चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. 


• बॅरिस्टर महम्मद अली जीना यांनी
द्‌विराष्ट्र
सिद्धान्त मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम 
राष्ट्राची मागणी केली.

•  १९४६ च्या मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही.अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर 
मांडली. तिला ‘त्रिमंत्री योजना’ म्हणतात.

• १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लीम
लीगने जाहीर केले.


• माउंटबॅटन योजनेच्या आधारे १८ जुलै १९४७ रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला.


• १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची निर्घृण हत्या केली. 

        Online Test सोडवा.


Post a Comment

Previous Post Next Post