होळी दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

 होळी दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा 




होळी आपण का साजरा करतो ती जाणून घ्या.


    एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता.तो स्वतःला खूपच सामर्थ्यशाली व बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो सर्व देव-देवतांची ग्रहणा करायचा.तसेच त्याला भगवान विष्णूचे नाव ऐकल्यास भरपूर राग यायचा परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. आणि हे हिरण्यकशिपुला अजिबात पसंत नव्हते. त्याने अनेक प्रकारे आपल्या मुलास घाबरवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व निष्फळ ठरले भक्त प्रल्हाद त्यांना न घाबरता त्यांच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.



      ह्या सर्व गोष्टी ला कंटाळून राजाने एक योजना आखली. आणि त्यानुसार आपली बहीण होलीका हिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकला भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले.भक्त प्रल्हाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला. आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली तेव्हा  होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्या वेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.भक्त प्रल्हादाला अग्नीत काहीच करू शकले नाही मात्र होलिकेला त्या अग्नीत जाळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवसापासून आपण हा उत्सव साजरा करतो.



       या सणाच्या निमित्ताने आपण आपल्यातील होलिका रूपी विचार अग्नीमध्ये जाळून टाकले पाहिजे आणि रंगीबेरंगी अशा नवीन जीवनाला सुरुवात केली पाहिजे हे या सणाच्या निमित्तानं आपण चांगले विचार आपल्यात घेतले पाहिजेत.


या सणाच्या  सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…

Holi Safety Best Tips:होळी खेळताना घ्यावयाची काळजी 

      

  •     Skin friendly रंगाचा  वापर करा.

  • भेसळ युक्त रंगामुळे शरीराचे खूप नुकसान होते ते वापरणे टाळा.

  • एखाद्याची  इच्छा नसेल तर त्यांना रंग लावून नये.आज-काल होळीसारख्या सणाला भांडण होण्याचे प्रमाण वाढत आहे.

  • हा सण आनंदाने उत्साहाने साजरा करावयास हवा.

  • होळी या सणाचे पावित्र्य आपण जपले पाहिजे.



Post a Comment

Previous Post Next Post