NMMS Exam विज्ञान ताऱ्यांची जीवनयात्रा

 


NMMS Exam

विज्ञान 

ताऱ्यांची जीवनयात्रा


🎯ग्रहमालिका व तार्‍यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या *आंतरतारकीय मेघांचा* समूह असतो.


🎯आपली दिर्घिका ही चक्राकार असून तिला *मंदाकिनी* हे नाव दिलेले आहे.


🎯रात्री आकाशात आपण सुमारे *4000* तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.


🎯*तारे* हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात.


🎯सूर्याच्या वस्तुमानाचा *72 टक्के भाग हायड्रोजन* आहे तर *26 टक्के भाग हेलियम* व 2% टक्के इतर भाग आहे.

                                              

🎯आपल्या आकाशगंगेत सुमारे (10 चा 11 वा घात)इतके तारे आहेत.


🎯सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळात म्हणजे गेली *4.5 अब्ज वर्षे* बदललेले नाहीत.


🎯प्रकाशाचा वेग *300000 km/s* अाहे.


🎯मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ *प्रकाश वर्ष (light year)* हे एकक वापरतात.


🎯सूर्यात ही ऊर्जा *हायड्रोजनच्या केंद्रकाचे*  एकत्रीकरण होऊन *हेलियमचे केंद्रक* तयार होणे या प्रक्रियेतून उत्पन्न होते म्हणजे सूर्याच्या  केंद्रभागातील हायड्रोजन हा इंधनाचे कार्य करतो.


🎯प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास *1 सेकंद* लागतो. सूर्यापासून येण्यास *8 मिनिटे* लागतात.


🎯 वायूच्या कणांमधील *गुरुत्वीय बल* हे तार्‍यातील तप्त वायु कनांना एकत्र ठेवण्याचे कार्य करते.


🎯तांबडा राक्षसी तारे ची अंतिम अवस्था *श्वेतबटू* अवस्था ही आहे.


🎯महाराक्षसी ताऱ्यांची अंतिम अवस्था *न्यूट्रॉन तारे* ही आहे.


🎯ताऱ्यांचा जन्म *आंतरतारकीय मेघा* पासून होतो.


🎯ताऱ्यांच्या जीवनकाळात किती प्रकारचे इंधने वापरली जातात हे त्याच्या *वस्तूमानावर*  अवलंबून असते.


*Inspiring Education (YouTube)*

       *बिरादार शशिकांत लिंबराज*

             *9881898161*

Post a Comment

Previous Post Next Post